Chandrashekhar Bawankule | एमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो; बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Chandrashekhar Bawankule | औरंगाबाद : केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नामांतराला मंजूरी दिली आहे. त्यानंतर आता औरंगाबाद शहराचं नाव अधिकृतपणे ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्यात आलं आहे. औरंगाबादच्या नामकरणानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराच्याविरोधात साखळी उपोषण सुरू केलं आहे. हे उपोषण सुरू असताना आंदोलनस्थळी काही जणांनी औरंगजेबाचे पोस्टर झळकवले आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर इम्तियाज जलील यांनी … Read more

Published On: 

Chandrashekhar Bawankule | औरंगाबाद : केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नामांतराला मंजूरी दिली आहे. त्यानंतर आता औरंगाबाद शहराचं नाव अधिकृतपणे ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्यात आलं आहे. औरंगाबादच्या नामकरणानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराच्याविरोधात साखळी उपोषण सुरू केलं आहे. हे उपोषण सुरू असताना आंदोलनस्थळी काही जणांनी औरंगजेबाचे पोस्टर झळकवले आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर इम्तियाज जलील यांनी त्वरीत ते पोस्टर हटवले आहेत. आंदोलनस्थळी घडलेल्या या प्रकारानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगजेबाचे तुष्टीकरण करण्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “औरंग्याच्या तुष्टीकरणावर तुम्ही काही बोलणार आहात की मूग गिळून गप्प बसणार आहात? असा खोचक सवाल चंद्रशेखर बावनकुळेंनी विचारला आहे. बावनकुळेंनी यासंदर्भात ट्वीट करत ही टीका केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंचं ट्वीट

“छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकलेत. शिवरायांच्या पावन भूमीत औरंग्याचं समर्थन कशासाठी? औरंग्याचं तुष्टीकरण करणाऱ्या प्रवृत्तीचा बीमोड करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे, तुम्ही औरंग्याच्या तुष्टीकरणावर काही बोलणार आहात की मूग गिळून गप्प बसणार आहेत?” असा आक्रमक प्रश्न चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे

महत्वाच्या बातम्या-

.

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही