‘आधी जनतेतून निवडून या, मग निवडणूक आली की पवारांना जात आठवते असं म्हणा’

कोल्हापूर :  शरद पवार यांनी 14 वेळा निवडणूक लढवली, पण चंद्रकांत पाटील यांनी जनतेतून निवडून यावे. त्यानंतर, निवडणूक आली की पवारांना जात आठवते, असे वक्तव्य करावे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. पवार यांनी कोल्हापूर येथील कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर चांगलीच घणाघाती टीका केली.

मराठा आंदोलन पेटवणा-या नेत्यांचं संभाषण आमच्या हाती आहे. वेळ आल्यावर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी केलं आहे. एबीपी माझाच्या मुलाखतीत मराठा आंदोलनातील हिंसाचारावर काल त्यांनी भाष्य केलं होतं .

पवार यांनी कोल्हापूर येथील कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रेकॉर्डिंगच्या मुद्द्यावरुनही चांगलंच धारेवर धरलं. सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येणारे वक्तव्य हे आगीत तेल ओतणारे आहे. असे वक्तव्य करण्यापेक्षा त्यांनी रेकॉर्डिंग सादर करावे, असेही पवार म्हणाले.

कर्नाटकाप्रमाणे काँग्रेसने महाराष्ट्रातही समंजसपणाची भूमिका घ्यावी – पवार

हातापाया पडतो पण मराठ्यानो आंदोलन मागे घ्या : चंद्रकात पाटील