Share

भारत निष्पाप लोकांची हत्या करत असल्याचा पाकिस्तानचा आरोप; पहलगाम हल्ला राजकीय प्रेरित

Pakistan’s military accuses India of killing civilians for political motives; criticises Indian media for blaming Pakistan without evidence after Pahalgam attack.

Published On: 

Pakistan’s military accuses India of killing civilians for political motives; criticises Indian media for blaming Pakistan without evidence after Pahalgam attack.

🕒 1 min read

इस्लामाबाद | पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्यांनी भारतावर निष्पाप नागरिकांवर हल्ला करून राजकीय हेतू साध्य करत असल्याचा आरोप केला आहे. इस्लामाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी, पाकिस्तान हवाई दलाचे जनसंपर्क प्रमुख एअर व्हाइस मार्शल औरंगजेब अहमद, तसेच नौदलाचे उपप्रमुख रिअर अॅडमिरल राजा रब नवाज उपस्थित होते.

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर केवळ 10 मिनिटांत भारत सरकारने पाकिस्तानवर आरोप केल्याचं नमूद करत चौधरी यांनी विचारले, “दहा मिनिटांत कोण आरोपी आहे हे कसं काय ठरवलं गेलं?” पुराव्याशिवाय पाकिस्तानवर दोष ठेवण्यामागे भारताचे अंतर्गत प्रश्नांपासून लक्ष हटवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला.

Pakistan Accuses India of Civilian Killings for Political Goals, Denies Role in Pahalgam Attack

ते पुढे म्हणाले, “भारत यापूर्वीही असे प्रकार करत आला आहे. हल्ल्यांमागे पाकिस्तान असल्याचं भासवून लगेच लष्करी मोर्चा उघडण्याचं धोरण स्वीकारलं जातं.” चौधरी यांनी आरोप केला की भारताने पाकिस्तानच्या हद्दीत शस्त्रहल्ले करताना महिला व लहान मुलांसारख्या निष्पाप नागरी लोकांना लक्ष्य केलं आहे.

पाकिस्तान लष्कराच्या जनसंपर्क विभागाचे महासंचालक (DG ISPR) यांनी भारताने केलेल्या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, पहलगाममधील दहशतवादी हल्ला तसेच गेल्या ४८ तासांत भारतीय सीमेत झालेल्या कथित हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा कोणताही सहभाग असल्याचा भारताकडे ठोस पुरावा नाही.

DG ISPR म्हणाले, “भारत फक्त मनगढंत कथा तयार करत आहे. आता वेळ आली आहे की भारतीय सरकारने वास्तव स्वीकारून स्वतःला कठोर प्रश्न विचारावेत. सिनेमे आणि नाटकांमध्ये जगणं थांबवणं गरजेचं आहे.

त्यांनी भारतीय माध्यमांवरही टीका करत, माहितीच्या सत्यतेकडे दुर्लक्ष करून भावनिक आणि राजकीय नॅरेटिव्ह पसरवल्याचा आरोप केला.

📌 महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Crime India Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या