🕒 1 min read
इस्लामाबाद | वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारतावर जोरदार टीका करत म्हटलं आहे की, ९ मेपर्यंत झालेल्या भारतीय हल्ल्यांत ३३ पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला असून ६२ नागरिक जखमी झाले आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय माध्यमांना भारतातील अहवालांवर विश्वास ठेवण्याआधी सत्यता पडताळण्याचे आवाहन केले आहे.
DG ISPR यांनी सांगितलं की, “भारत हा सध्या फेक न्यूज आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीचा मोठा कारखाना बनला आहे. ISPR ने आतापर्यंत भारताकडून पाठवण्यात आलेले ७७ इस्रायली ड्रोन निष्क्रिय केल्याचा दावा देखील त्यांनी केला.”
DG ISPR slams India media for misinformation
त्यांनी भारतावर माध्यम स्वातंत्र्य दडपल्याचा आरोप करत म्हटलं की, “भारतातून सोशल मीडिया, X (पूर्वीचे ट्विटर) आणि न्यूज पोर्टल्स बंद केले जात आहेत, ही माहिती लपवण्याची कृती आहे.”
पुढे म्हणाले, “तुमच्यात सत्य ऐकण्याची क्षमता, संयम आणि नैतिकता नाही. जर तुम्हाला इतकं पाकिस्तानकडून गोळीबार व्हावा असं वाटत असेल, तर आम्ही तो तुमच्या ठरवलेल्या वेळ, जागा आणि साधनांच्या आधारे करू. “भारताकडून पाकिस्तानी ड्रोन पाडल्याचे दावे फेटाळून लावत त्यांनी विचारले, “कमीत कमी एक तरी पाकिस्तानी विमान किंवा ड्रोनचा अवशेष दाखवा.”
अहमद शरीफ चौधरी यांनी भारतीय माध्यमांवरही टीका करत म्हटलं, “भारतीय मीडिया ही पत्रकारितेची शोकांतिका आणि थट्टा झाली आहे. आम्ही प्रत्येक ड्रोन निष्क्रिय करत आहोत. एकही परत गेला नाही आणि जाणारही नाही.”
📌 महत्वाच्या बातम्या
- भारताचा प्रोपगंडा आमच्यासाठी विनोदी; पाकिस्तान लष्करी प्रवक्त्याची टीका
- भारत निष्पाप लोकांची हत्या करत असल्याचा पाकिस्तानचा आरोप; पहलगाम हल्ला राजकीय प्रेरित
- भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर BCCI चा मोठा निर्णय; IPL 2025 आठवड्यासाठी स्थगित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now