Sanjay Raut | खासदार संजय राऊतांचा अयोध्यातील शक्तिप्रदर्शनावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Sanjay Raut | मुंबई : सध्या राज्यात अवकाळी पावसामुळे हाहाकार माजवला आहे. गारपिटीने फळपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. यामुळे विरोधी पक्षनेते यांनी सरकारवर निशाणा साधत शेकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या असं म्हटलं आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कालच्या शिंदे-फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका देखील केली आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचा गट रामाचं दर्शन घ्यायला गेलाच नव्हता. ते शक्तीप्रदर्शनासाठी गेले होते, असं म्हणत सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर त्यांनी मोदींवर देखील प्रश्न उपस्थित केले.

संजय राऊत म्हणाले की, अयोध्येला जायला हरकत नाही. पण श्रद्धा असेल तरच गेले पाहिजे. काल हे लोक त्या ठिकाणी गेले. त्यांनी तिथे शक्तीप्रदर्शन केलं. शक्तीप्रदर्शनच करायचं होतं तर अयोध्येत जाण्याची गरज नाही. ठाण्याचा नाका आहे ना. तिथे करा शक्तीप्रदर्शन, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

तसचं पुढे राऊत म्हणाले, काल अयोध्येत दर्शनापेक्षा शक्तीप्रदर्शनच जास्त होतं. याआधी देखील दर्शन आम्ही घेतलं आहे. दर्शन घेताना कालची टोळीही आमच्यासोबत होती. दर्शन आणि शक्तीप्रदर्शन यातील भेद जाणून घ्या. ज्या रामाची पूजा केली त्यांनी वनवासात जाताना भावाला राज्य दिलं होतं. भरतानं रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या होत्या. रामाचा विचार अंमलात आणला. पण गद्दारांनी काय केलं? शक्तीप्रदर्शन करायला अयोध्या कशाला पाहिजे. तुमचा ठाण्याचा नाका आहे ना. तिथेही करता येईल शक्तीप्रदर्शन. तुमच्या विमानात गुंड, मवाली बसले होते. त्याचे फोटो आज प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना शुद्ध करण्यासाठी शरयूला घेऊन गेला होता का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी शिंदेंना केला.

दरम्यान, राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून देखील प्रश्न उपस्थित केला. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडे डिग्री नसली तरी चालेल. त्यामुळे काही फरक पडत नाही. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे डिग्री नसेल तर काही हरकत नाही. पण असेल तर योग्य असावी. नाही तर विद्यापीठे बोगस डिग्रीचे कारखाने होतील, पंतप्रधानांनी डिग्री दाखवली पाहिजे. ते म्हणतात मी विद्यापीठात गेलो नाही. शिकलेलो नाही. मग डिग्री आली कुठून?? असा प्रश्न उपस्थित करत मोदींनवर देखील निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या-