Share

ICC Womens World Cup 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर

ICC Women’s World Cup 2025 starts on Sept 30, hosted by India & Sri Lanka.

Published On: 

ICC Women World Cup 2025 starts on Sept 30, hosted by India & Sri Lanka.

🕒 1 min read

मुंबई | प्रतिनिधी: क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसीने वूमन्स वर्ल्ड कप 2025 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेला ३० सप्टेंबर २०२५ पासून सुरुवात होणार असून अंतिम सामना २ नोव्हेंबरला होईल.

स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे संयुक्तपणे आहे. पहिला सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार असून अंतिम सामनाही याच स्टेडियमवर होणार आहे. मात्र, पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचल्यास अंतिम सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये होईल.

ICC Women World Cup 2025 Schedule

वर्ल्ड कपमधील सामने ५ स्टेडियममध्ये खेळवले जातील. भारतातील बंगळुरू (एम. चिन्नास्वामी), गुवाहाटी (एसीए), इंदूर (होळकर), आणि विशाखापट्टणम (एसीए-व्हीडीसीए) या ४ स्टेडियममध्ये होणार तर श्रीलंकेत कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये सामने होतील.

या स्पर्धेत 8 संघ एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. नॉकआउट फेरी 29 ऑक्टोबरला गुवाहाटी किंवा कोलंबो येथे होईल, तर दुसरी उपांत्य फेरी 30 ऑक्टोबरला बंगळुरूत होणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
India Cricket Marathi News Sports

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या