Share

Kangana Ranaut | “देशाला गरज असेल तर मला राजकारणात प्रवेश करायला आवडेल” – कंगना रानौत

Kangana Ranaut | मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) कायमच आपल्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. तर आता एका मुलाखतीदरम्यान कंगना रनौतने मला राजकारणात प्रवेश करायला आवडेल असं वक्तव्य केलं आहे . याचप्रमाणे तिने तिच्या मुंबई महापालिकेने पडलेल्या मुंबईतील घराचा उल्लेख देखील करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मला राजकारणात प्रवेश करायला … Read more

Published On: 

Kangana Ranaut | मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) कायमच आपल्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. तर आता एका मुलाखतीदरम्यान कंगना रनौतने मला राजकारणात प्रवेश करायला आवडेल असं वक्तव्य केलं आहे . याचप्रमाणे तिने तिच्या मुंबई महापालिकेने पडलेल्या मुंबईतील घराचा उल्लेख देखील करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मला राजकारणात प्रवेश करायला नक्की आवडेल : कंगना रनौत

मुलाखतीदरम्यान कंगना रनौत म्हणाली की, मला सुरुवातीपासूनच समाजकार्य करायला आवडत. तसाच मला राजकारणाची देखील आवडत आहे. यामुळे जर मला राजकीय कोणत्याही पक्षाने संधी दिली तर मी राजकारणात प्रवेश करेल. याचप्रमाणे देशाचा विचार करुन, “देशाला माझी गरज असेल तर मला राजकारणात प्रवेश करायला आवडेल” हे वक्तव्य कंगनाने केलं आहे. तसचं मी राजकारणात काम करण्यासाठी पात्र आहे की नाही हे जनता ठरवेल. पण मी अभिनय आणि राजकीय क्षेत्रात झोकून काम करेल. असं कंगना म्हणाली.

(I would definitely like to enter politics: Kangana Ranaut)

दरम्यान, कंगनाने नाव न घेता उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे. मला अनेक लोक चुकीच समजतात. काहीही बोलते म्हणतात परंतु, मी कोणत्या व्यक्तीची बाजू घेत नाही. माझं नुकसान होत असलं तरी देशाचा विचार करुन एखाद्या गोष्टीवर मी व्यक्त होत असते. माझं मत अनेकांना खटकतं. माझी लढाई एखाद्या व्यक्तीसोबत नसून त्या व्यक्तीच्या विचारांसोबत आहे. ज्यावेळी माझं मुंबईमधील घर मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाणे पडलं तेव्हा मात्र त्यांनी हातातल्या सत्तेचा चुकीच्या पद्धतीने वापर करत माझं घर पाडल. अशा प्रकारे माझं घर पडलं जाईल याचा विचार देखील मी केला नव्हता. असं म्हणत कंगनाने ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही