Asim Sarode | कुणाची राजकीय समीकरणे बळकट होऊ द्यायची, कुणाची खिळखिळी करायची यासाठी सरकारी यंत्रणा – असीम सरोदे

Asim Sarode | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलाचं तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा आणि उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा या सगळ्या गोष्टींमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशात असीम सरोदे यांच्या फेसबुक पोस्टमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. इन्कमटॅक्स डिपार्टमेंट, सीबीआय आणि इडी (ice) पुन्हा एकदा जोमाने कामाला लागणार असल्याचं त्यांच्या या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

असीम सरोदे यांनी फेसबुक पोस्ट (Facebook post by Asim Sarode -)

ice महाराष्ट्रात लवकरच पुन्हा जोमाने कामाला लागणार.’ice’ म्हणजे incomtax department+CBI+ed.

कुणाची राजकीय समीकरणे बळकट होऊ द्यायची, कुणाची खिळखिळी व थंड करायची यासाठी ice.

कुणी भाकरी/पोळी फिरवा किंवा तशीच ठेवा, कुणाला भाकरी/पोळी भाजू द्यायची हे ठरवणार ice.

संपूर्ण यंत्रणा हाताशी घेऊन लोकशाहीला बुलडोझ करण्याचे व्यवस्थापन ‘ कायद्याने राज्य’ चालवणे म्हणजेच Rule of Law असणे नसून ‘कायद्याच्या मदतीने राज्य चालवणे’ Rule by Law आहे याची जाणीव सामान्य नागरिकांना आता झालेली आहे. असे राजकारण कोणताही राजकीय पक्ष करो त्यांचा निषेध करावा लागेल.

आपल्या मागे ice लावून घ्यायचा नाही असे वाटत असेल त्यांच्यासाठी कमळाच्या फुलाचा शुभसंकेत लावलेले महाद्वार उघडे आहे. हे महाद्वार थेट पापक्षालन करून देणारे व शुद्धतेकडे नेणाऱ्या सुखावह वाटेवर घेऊन जाते.

भ्रष्ट राजकीय व्यक्ती कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर प्रेम करण्याची गरज नाही, शिक्षा झालीच पाहिजे प्रश्न निवडक पद्धतीने चौकशी करणे, विशिष्ट पक्षांच्या लोकांवर कारवाई करण्याचा बेकायदेशीरतेचा आहे.

असीम सरोदे यांच्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भ्रष्ट राजकीय व्यक्ती कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर प्रेम करायची गरज नाही त्याला शिक्षा झालीच पाहिजे असं त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

Back to top button