Share

Uddhav Thackeray | “शिंदेंची देशात गद्दार म्हणून ओळख…” ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

Uddhav Thackeray | सोलगाव: उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यावर ठाकरेंनी सोलगावमध्ये रिफायनरीला विरोध करत लोकांशी संवाद साधला आहे. त्याचबरोबर यावेळी ग्रामस्थांनी रिफायनरीला विरोध केला आहे. कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका मांडत असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका … Read more

Published On: 

Uddhav Thackeray | सोलगाव: उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर गेले आहे. या दौऱ्यावर ठाकरेंनी सोलगावमध्ये रिफायनरीला विरोध करत लोकांशी संवाद साधला आहे. त्याचबरोबर यावेळी ग्रामस्थांनी रिफायनरीला विरोध केला आहे. कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका मांडत असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देशात गद्दार म्हणून ओळख आहे. त्यांना तीन जिल्ह्यात कोणी ओळखत नव्हतं.” रिफायनरी प्रकल्प गुजरातला घेऊन जा आणि गुजरातला गेलेला प्रकल्प पुन्हा आणून द्या, रिफायनरी प्रकल्प होणार नाही, असा थेट इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला आहे.

“मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही. रिफायनरीसाठी लोकांची डोकी फोडण्याची योजना आखली जात आहे. रिफायनरीचं समर्थन करून दाखवा असं”, आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजकर्त्यांना केलं आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज कोकण दौऱ्यावर आहे. ते बारसू, सोलगाव, साखरकुंबे या गावांना भेट देऊन तेथील ग्रामस्थांच्या भावना जाणून घेणार आहे. त्यानंतर ठाकरेंची महाड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेमध्ये ते रिफायनरी प्रकल्पासंबंधात आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही