Weather Update | नागरिकांनो काळजी घ्या! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस घालणार धुमाकूळ

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. बदलत्या हवामानामुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात 8 मे पासून वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस थैमान घालणार आहे. 8 मे नंतर राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून (Weather Update) देण्यात आला आहे. अहमदनगर, नाशिक, पुणे, बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी असे, आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

पुढचे दोन दिवस लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे (Weather Update) शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या उन्हाळी पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.

शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.