Share

Devendra Fadnavis | मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच : देवेंद्र फडणवीस

🕒 1 min readDevendra Fadnavis | कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवारांच्या राजीनाम्यानंतर आज मुंबईत राष्ट्रवादी कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवड समितीमार्फत पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला. त्याचबरोबर पवारांनी अध्यक्ष पदावर कायम राहावे अशी विनंती समितीने केली आहे. अशा देवेंद्र फडणवीस … Read more

Published On: 

🕒 1 min read

Devendra Fadnavis | कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवारांच्या राजीनाम्यानंतर आज मुंबईत राष्ट्रवादी कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निवड समितीमार्फत पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला. त्याचबरोबर पवारांनी अध्यक्ष पदावर कायम राहावे अशी विनंती समितीने केली आहे. अशा देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी पुन्हा येईल म्हटलं तर येतोच, असं देखील देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी कसा येतो हे तुम्हाला माहीतचं आहे. आणि मी जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी नक्कीच येतो. आपण कुठूनही परतू शकतो.”

राष्ट्रवादीतील घडामोडींवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया (Reaction of Devendra Fadnavis to the situation in NCP)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सध्या प्रचारासाठी कर्नाटकमध्ये आहे. तिथं माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा एक अंतर्गत चित्रपट सुरू आहे. या चित्रपटामध्ये कलाकार आणि पटकथा देखील अंतर्गत आहे. जोपर्यंत हा चित्रपट संपत नाही तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? या चित्रपटाचा जेव्हा शेवट संपेल तेव्हाच आम्ही यावर प्रतिक्रिया देऊ.”

राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे? (What is going on in NCP?)

आज झालेल्या बैठकीमध्ये शरद पवार अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. पवारांनीच पक्षाच्या अध्यक्षपदावर कायम राहावं, असा प्रस्ताव या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. या निवड समितीतील महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना समितीचा निर्णय सांगितला आहे. मला विचार करायला वेळ द्या मी विचार करून निर्णय देतो, असं उत्तर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. आता सर्वांचे लक्ष शरद पवार यांच्या निर्णयाकडे लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!