KL Rahul | टीम इंडियाच्या चिंतेत भर! आयपीएल नंतर केएल राहुल WTC मधून बाहेर?

KL Rahul | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये भारतीय खेळाडूंची दुखापत हा चिंतेचा विषय ठरत आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंना गंभीर जखमा झाल्या आहेत. पुढच्या महिन्यामध्ये भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना खेळायचा आहे. अशात लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल आयपीएल सोबतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मधूनही बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या सामन्यादरम्यान गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मांडीला दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएलच्या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मधूनही बाहेर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केएल राहुलच्या या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या चिंतेत भर पडली आहे. पुढच्या महिन्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. त्याआधी केएल राहुल बरा झाला नाही, तर त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला मुकावे लागू शकते.

दरम्यान, पुढच्या महिन्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर झालेला असून, केएल राहुल देखील टीमचा भाग आहे. अशात राहुलच्या दुखापतीमुळे BCCI च्या चिंतेत वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.