Honeytrap | हनीट्रॅपमध्ये अडकला DRDO चा संचालक; पाकिस्तानला दिली गुपित माहिती

पुणे : एटीएसने नुकतीच माहिती दिली आहे की, भारतासंबंधित गुपित माहिती पाकिस्तानला दिल्या प्रकरणी DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकर ( Pradeep Kurulkar) यांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. तर तपासादरम्यान अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. यामध्ये त्यानी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या व्यक्तीशी संपर्क साधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तसचं प्रदीप कुरुलकरनी आपल्या पदाचा गैरवापर केला. डी.आर.डी.ओ. (DRDO) च्या शास्त्रज्ञ कार्यालयामधील शासकीय माहिती देखील पुरवली. त्यांच्यावर संशय आल्यानंतर चौकशी केली असतात. ते पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह हस्तकाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअप व्हॉइस मेसेज, व्हिडीओ कॉल यांच्या माध्यमातून संपर्कात असल्याचा धक्कादायक प्रकार 3 मे रोजी समोर आला होता. त्यानंतर आता त्याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, अवघे सहा महिनेच त्याच्या निवृत्तीला राहिले होते. त्याआधीच हा प्रकार घडला आहे. तसचं गेले 6 महिने ते देशाची माहिती पाकिस्तानला पोहचवत असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. तर कुरुलकर हे एका पाकिस्तानी महिलेशी मोबाइलवरून संवाद साधत असल्याचं सांगितलं जातं आहे. याचप्रमाणे पुणे हनीट्रॅपमध्ये अडकलेले आणि एटीएसकडून अटक करण्यात आलेले डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी जवळपास सहा वर्षे भारतरत्न अब्दुल कलाम यांच्याबरोबर काम केलं आहे. यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं आहे. तरी देखील त्यांनी असा प्रकार का केला याबाबत सखोल चौकशी करण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या-

Back to top button