Ajit Pawar | निवड समितीचे निर्णयावर अजित पवार नाराज? काहीचं प्रतिक्रिया न देता पडले बाहेर

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तब्बल तीन दिवस झाले आहे. त्यांच्या या निर्णयानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. मात्र, अजित पवार यांनी त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिल्याचं दिसून आलं होतं.

निवड समितीने पवारांचा राजीनामा फेटाळला (selection committee rejected Sharad Pawar resignation)

शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच व्हावे आणि पवारांनी हा राजीनामा मागे घ्यावा, असा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला आहे. निवड समितीने एकमताने पवारांचा राजीनामा नामंजूर केला आहे.

शरद पवारांचे निर्णयाला फक्त अजित पवारांचा पाठिंबा ( Ajit Pawar supports Sharad Pawar’s decision)

शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. फक्त अजित पवार त्यांच्या या निर्णयाच्या पाठीशी असल्याचे दिसून आलं होतं. अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या निर्णयाचे महत्त्व समजावून सांगितलं.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “तुम्ही सगळे गैरसमज करून घेत आहात. पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे ते पक्षात नाही असं नाही. साहेब निवृत्त जरी होत असले, तरी ते पक्षासाठी कायम हजर राहणार. साहेबांच्या वयाचा विचार करत आपणही जबाबदारी दुसरे नेतृत्वाकडे देत आहोत. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार आहे. शेवटी साहेब म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. पवार साहेबांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या जो कोणी पक्षाचा अध्यक्ष होईल तो पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच काम करेल.”

आज निवड समितीने शरद पवारांच्या राजीनामा नामंजूर केल्यानंतर अजित पवार काहीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेले. काहीही न बोलता निघून गेल्यावर अजित पवार (Ajit Pawar) निवड समितीच्या निर्णयावर नाराज आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.