Share

Ajit Pawar | ‘देश का नेता कैसा हो..’ ; अजित पवारांच्या एन्ट्रीवर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन तब्बल तीन दिवस झाले आहे. पवारांनी हा राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी करत आहेत. मात्र, अजूनही पवारांनी माघार घेतलेली नाही. अध्यक्षपदाच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी आज पक्षाच्या समितीची बैठक होणार आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष … Read more

Published On: 

Ajit Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन तब्बल तीन दिवस झाले आहे. पवारांनी हा राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी करत आहेत. मात्र, अजूनही पवारांनी माघार घेतलेली नाही. अध्यक्षपदाच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी आज पक्षाच्या समितीची बैठक होणार आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना अजित पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

अजित पवार (Ajit Pawar) बैठकीसाठी पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांची एन्ट्री होतात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली होती.’देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. यावर अजित पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते सरळ पक्षाच्या कार्यालयात निघून गेले आहे.

सकाळी 11 वाजता अध्यक्षपदाचे निर्णयावर फेरविचार करण्याची बैठक सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्यावर या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. या समितीमध्ये एकनाथ खडसे यांचाही समावेश आहे.

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, एकनाथ खडसे, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा या बैठकीमध्ये समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही