Weather Update | राज्यात आजही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यात आजही अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.

दक्षिण बंगाल उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता (Weather Update) आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये आज पुणे, अहमदनगर, नाशिक, हिंगोली, लातूर, परभणी या ठिकाणी गारपिट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका (‘These’ districts will be affected)

राज्यामध्ये पुढील दोन दिवस छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, अहमदनगर, ठाणे, नाशिक, धुळे, पुणे, सातारा, नांदेड, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात (Weather Update) आली आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यातील काही भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे, आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, देशात यावर्षी एप्रिल महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत तो 109 टक्के अधिक होता. उत्तर भारत आणि दिल्लीमध्ये पावसाचा जोर अधिक होता. तर, मध्य आणि दक्षिण भारतामध्ये पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा होता. अशात आगामी काळामध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.