Sharad Pawar | शरद पवार निर्णयावर ठाम राहणार की भूमिका बदलणार

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पवारांचा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. यानंतर शरद पवार आपला निर्णय बदलणार का? याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे.

निवड समितीने पवारांचा राजीनामा फेटाळला (The selection committee rejected Sharad Pawar’s resignation)

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच व्हावे, असा प्रस्ताव प्रफुल्ल पटेल यांनी बैठकीत मांडला आहे. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा ठराव या बैठकीत मांडण्यात आला आहे. आता पवार (Sharad Pawar) काय निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पवार कार्यकर्त्यांच्या दबावाखाली येऊन निर्णय बदलतील का? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.

शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू असताना कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले होते. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे पवार (Sharad Pawar) यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

कार्यकर्त्यांच्या या सगळ्या हरकतीनंतर शरद पवार (Sharad Pawar) त्यांच्या दबावाला बळी पडतील का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचबरोबर सर्वांचे लक्षं आता पवारांच्या निर्णयाकडं लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.