Sanjay Raut | शरद पवारांचा राजीनामा फेटाळणे अपेक्षित होते – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पवारांचा पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. नवीन अध्यक्षाची निवड करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली आहे. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “शरद पवार यांचा राजीनामा फेटाळणे अपेक्षित होते. कारण पवारांशिवाय राष्ट्रवादीला पर्याय नाही. पवारांची राज्याला आणि देशाला गरज आहे अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे यांच्या भावना निवड समितीपर्यंत पोहोचली आहे. पवारांनी मुख्य प्रवाहात राहावे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा डाव भाजप आखात आहे. मात्र, त्यांचा हा डाव अयशस्वी ठरणार आहे. कारण निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडला आहे. निवड समितीने एकमताने पवारांचा राजीनामा नामंजूर केला आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. फक्त अजित पवार त्यांच्या या निर्णयाच्या पाठीशी असल्याचे दिसून आलं होतं. अजित पवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या निर्णयाचे महत्त्व समजावून सांगितलं. मात्र, आज निवड समितीने शरद पवारांच्या राजीनामाना मंजूर केल्यानंतर अजित पवार काहीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेले. काहीही न बोलता निघून गेल्यावर अजित पवार निवड समितीच्या निर्णयावर नाराज आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या