Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर आज मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शरद पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. पवारांनीच पक्षाच्या अध्यक्षपदावर कायम राहण्याची विनंती निवड समितीने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी पवारांना (Sharad Pawar) राजीनामा मागं घेण्याचा आग्रह करत आहे. मात्र, शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्यास नकार दिला, असल्याची माहिती मिळाली आहे. निवड समितीतील सदस्यांनी पवारांची भेट घेत त्यांना समितीचा निर्णय कळवला आहे.
प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवड समितीचे म्हणणे ऐकून घेतले आहे. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांकडून शरद पवारांना तातडीने निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे. तुमचा प्रस्ताव माझ्यापर्यंत पोहोचला आहे. आता मला थोडा वेळ द्या मी विचार करून निर्णय सांगतो, असं पवार यावेळी म्हणाले आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू असताना कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले होते. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कार्यकर्त्यांच्या या सगळ्या हरकतीनंतर शरद पवार त्यांच्या दबावाला बळी पडतील का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचबरोबर सर्वांचे लक्षं आता पवारांच्या निर्णयाकडं लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | शरद पवार निर्णयावर ठाम राहणार की भूमिका बदलणार
- Honeytrap | हनीट्रॅपमध्ये अडकला DRDO चा संचालक; पाकिस्तानला दिली गुपित माहिती
- Sanjay Raut | शरद पवारांचा राजीनामा फेटाळणे अपेक्षित होते – संजय राऊत
- Sharad Pawar | कमिटीच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
- Ajit Pawar | निवड समितीचे निर्णयावर अजित पवार नाराज? काहीचं प्रतिक्रिया न देता पडले बाहेर
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले