Devendra Fadnavis | “हा चित्रपट…” ; राष्ट्रवादीतील घडामोडींवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | हुबळी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. पवारांनी राजीनामा देऊ नये, अशी मागणी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर आज मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शरद पवारांचा राजीनामा फेटाळण्यात आला. या सर्व परिस्थितीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीतील घडामोडींवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया (Reaction of Devendra Fadnavis to the situation in NCP)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सध्या प्रचारासाठी कर्नाटकमध्ये आहे. तिथं माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा एक अंतर्गत चित्रपट सुरू आहे. या चित्रपटामध्ये कलाकार आणि पटकथा देखील अंतर्गत आहे. जोपर्यंत हा चित्रपट संपत नाही तोपर्यंत आम्ही काय प्रतिक्रिया द्यायची? या चित्रपटाचा जेव्हा शेवट संपेल तेव्हाच आम्ही यावर प्रतिक्रिया देऊ.”

राष्ट्रवादीत नेमकं काय सुरू आहे? (What is going on in NCP?)

आज झालेल्या बैठकीमध्ये शरद पवार अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळण्यात आला आहे. पवारांनीच पक्षाच्या अध्यक्षपदावर कायम राहावं, असा प्रस्ताव या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. या निवड समितीतील महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना समितीचा निर्णय सांगितला आहे. मला विचार करायला वेळ द्या मी विचार करून निर्णय देतो, असं उत्तर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. आता सर्वांचे लक्ष शरद पवार यांच्या निर्णयाकडे लागलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू असताना कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले होते. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.