Sanjay Shirsat | …म्हणून शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम : संजय शिरसाट

Sanjay Shirsat | मुंबई : 2 मे पासून राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी आपल्या ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या सोहळ्यादरम्यान अध्यक्षपदावरून निवृत्ती घेणार असल्याची जाहीर केलं होतं. त्यावरून सत्ताधारी पक्षाकडून देखील प्रतिक्रिया येत होत्या. नक्की राजीनामा देऊन शरद पवारांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी … Read more

Published On: 

Sanjay Shirsat | मुंबई : 2 मे पासून राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी आपल्या ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या सोहळ्यादरम्यान अध्यक्षपदावरून निवृत्ती घेणार असल्याची जाहीर केलं होतं. त्यावरून सत्ताधारी पक्षाकडून देखील प्रतिक्रिया येत होत्या. नक्की राजीनामा देऊन शरद पवारांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आणि पक्षातील अंतर्गत वादासाठी काय राजकीय खेळी असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर काल (5 मे) पवारांनी आपला राजीनाम्याची निर्णय माघारी घेतला आहे. त्यावरून आता शिवसेना (शिंदे गटा)चे नेते आमदार संजय शिरसाट( Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार यांच्यावरही खोचक टीका केली आहे.

पवारसाहेबांनी राजीनामा नाट्यात करेक्ट कार्यक्रम केला : संजय शिरसाट 

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले की, सर्वांनीच गेल्या 3ते4 दिवसांमध्ये बघितलं असेल जे काही शरद पवारांचं राजीनामा नाट्य चालू होतं. त्यामध्ये त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. पवारांनी जी काही पक्षामध्ये कुजबुज, चर्चा, नाराजी, कोणीतरी बंड करणार असल्याची चर्चा सुरू होती अशा अनेकांचा या राजीनामा नाट्यात करेक्ट कार्यक्रम केला आहे. असं शिरसाट म्हणाले . तसचं जेव्हा हे नाट्य सुरू होत तेव्हा तुम्ही निरीक्षण केलं की नाही हे माहीत नाही परंतु सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांच्या चेहऱ्यावर या निर्णयावरून काहीच तणाव वाटत नव्हता. यामुळे थोडी का असेल शंका होतीच की, काहीतरी राजकीय खेळ पवार करणार असं देखील शिरसाट म्हणाले.

(Pawarsaheb did a correct program in resignation drama: Sanjay Shirsat )

दरम्यान, शरद पवारांनी अनेक वेळा राजकीय चाली खेळत राजकीय डाव जिंकले आहेत. तसचं त्यांनी दाखवून दिलं की पक्षातील कोणीही हिंमत केली तर मी माझी ताकत दावेल. याचप्रमाणे अजित पवारांना देखील खोचक टोला लगावत म्हटलं की, आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या चलबिचलपनाला ब्रेक बसला आहे. आता त्यांच्याकडे शांत बसणे हा एकमेव पर्याय आहे. नक्कीच राष्ट्रवादीतली चलबिचल आता शांत होईल.अशा शब्दांत टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही