IPL 2023 | केएल राहुलच्या जागी ‘या’ खेळाडूची संघात एंट्री

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमधून लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याच्या मांडीला झालेल्या दुखापतीमुळे त्याला आयपीएलच्या सोळाव्या हंगामातून माघार घ्यावी लागली आहे. त्याचबरोबर पुढच्या महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मधूनही तो बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात लखनौ आणि टीम इंडियाच्या चिंतेत वाढ झाली आहे. लखनौमध्ये केएल राहुलच्या जागी टीम इंडियाच्या एका बॅट्समनची एन्ट्री झाली आहे. या खेळाडूंने भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रीशतक केलं होतं.

लखनौने केएल राहुलच्या जागी करुण नायर (Karun Nair) या खेळाडूला संधी दिली आहे. करूण नायर आईपीएल 2023 च्या ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. त्याला आता केएलच्या दुखापतीमुळे लखनौ सुपर जायंट्स संघात स्थान मिळाले आहे.

करुण आयपीएलच्या 15 व्या हंगामात राजस्थान रॉयल संघाचा भाग होता. तेव्हा त्याला फक्त तीन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. तीन सामन्यांमध्ये त्याने 16 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर त्याने आतापर्यंत एकूण 76 आयपीएल सामने खेळले आहे. यामध्ये त्याने 1 हजार 496 धावा केल्या आहेत.

दरम्यान, पुढच्या महिन्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर झालेला असून, केएल राहुल देखील टीमचा भाग आहे. अशात केएल राहुलच्या दुखापतीमुळे BCCI च्या चिंतेत वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.