Share

Ambadas Danve | “जे पाय ठेऊ न देण्याची भाषा करतात, त्याचा पायच शिल्लक ठेवणार नाही” : अंबादास दानवे

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर : नागपूर येथे उद्या महाविकास आघाडीची वज्र्यमूठ सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. याच सभेला अडथळा आणणाऱ्या भाजपसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे ( Ambadas Danve) यांनी तिखट शब्दात इशारा दिला आहे. सध्या काँगेस नेते महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्याच्या गाठीभेटी घेत असल्याचं पाहायला मिळत आहेत. त्याच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून राजकारणात जोरदार टीका केली जात आहे. राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी वीर सावरकरांची अवहेलना करत इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकदा नाही जाणीवपूर्वक पाचवेळा अपमान करण्यात आला. त्यामुळे राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांची माफी मागावी. मगच महाराष्ट्रात पाय ठेवावा,” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. तर आता भाजपला प्रतिक्रिया दानवे यांनी दिली आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे: (What Ambadas Danve said)

“महाराष्ट्रात कोणी कोणाला येऊ देणार नाही, अशा गोष्टी करू नये. राहुल गांधी काश्मीर श्रीनगरला जाऊन आले. मग, महाराष्ट्र काय काश्मीर श्रीनगर आणि पाकिस्तानात नाही. महाराष्ट्रात कोणीही येऊ शकते. त्यामुळे भाजपाने याला येऊ देणार नाही, त्याला देणार नाही, अशी भाषा करू नये. जे पाय ठेऊ न देण्याची भाषा करतात, त्याचा पायच शिल्लक ठेवणार नाही,” अशा शब्दांत अंबादास दानवेंनी अप्रत्यक्षपणे बावनकुळेंना बजावलं आहे.

तसचं त्यांनी राहुल गांधी जर मातोश्रीवर आले तर त्याच स्वागत कसं केलं जाईल असा प्रश्न विचारला असता दानवे म्हणाले की, मातोश्रीवर आतापर्यंत सगळे नेते येऊन गेलेत यामुळे यात काही फरक नाही किंवा नवीन काही नाही. सध्या आम्ही एकत्र आहोत. आणि यात जर राहुल गांधी आले तर तो एक प्रमुख भाग आहे. यामुळे कोणीही आडवण्याच्या भाषा करू नयेत. असं देखील दानवे यांनी म्हंटल.

महत्वाच्या बातम्या-

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर : नागपूर येथे उद्या महाविकास आघाडीची वज्र्यमूठ सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची जोरदार …

पुढे वाचा

Ahmednagar Chhatrapati Sambhajinagar Maharashtra Politics