Prakash Ambedkar | “भांडण लावणं हा भाजपचा फंडा”; पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar | मुंबई : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने चार दिवसांपूर्वीच युतीची घोषणा केली आहे. या युतीला चार दिवसही होत नाही तोच दोन्ही पक्षातील मतभिन्नता आणि शाब्दिक कलह सुरु असल्याचे समोर आले आहे.

ठाकरे आणि आंबेडकर यांच्या युतीनंतर ही युती किती काळ टिकणार? वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामिल होणार का? आंबेडकर आणि शरद पवार यांच्यातील वाद शांत होतील का?, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे भाजपचेच असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांचा हा आरोपावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यावर आता प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टीकरण दिले आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देत भाजपवर सडकून टीका केली आहे.

“इतिहासातील काही घटनांवरून मी ते वक्तव्य केले होते. त्याचा आताच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही. कोणी त्याला चुकीच्या पद्धतीने घेत असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही. भाजपला तुम्ही कमी लेखू नका. भाजप कोणत्याही परिस्थिती कोणत्याही स्थराला जाऊ शकते. भांडणे लावणे, मतभेत निर्माण करणे हा भाजपचा फंडा आहे. जेव्हा आपण निवडणूक जिंकत नाही, असे भाजपला वाटते तेव्हा ते भांडणं लावण्याचं काम करतात”, अशी टीका करत प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

महत्वाच्या बातम्या :