Mint Tea | उन्हाळ्यामध्ये करा पुदिन्याची चहाचे सेवन, आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Mint Tea | टीम महाराष्ट्र देशा: बहुतांश लोकांना आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करायला आवडते. हिवाळ्यामध्ये चहा पिणे आरोग्यासाठी योग्य असते. मात्र, उन्हाळ्यामध्ये चहाचे अति प्रमाणात सेवन केल्याने पोटात गॅस आणि ऍसिडिटीच्या समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही दुधाच्या चहा ऐवजी पुदिन्याच्या चहाचे सेवन करू शकतात. पुदिनाच्या चहाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, प्रोटीन, आयरन, पोटॅशियम, कॅल्शियम इत्यादी पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. पुदिन्याचा चहा बनवण्यासाठी तुम्हाला दहा ते बारा पुदिन्याची पाने एक कप पाण्यामध्ये उकळून घ्यावी लागेल. हे पाणी तुम्हाला अर्धे होईपर्यंत उकळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला त्याचे गाळून सेवन करावे लागेल. उन्हाळ्यामध्ये पुदिनाचा चहा प्यायल्याने शरीर थंड आणि फ्रेश राहते.

शरीर थंड राहते (The body remains cool-Mint Tea)

उन्हाळ्यामध्ये पुदिनाचा चहा प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. पुदिनाचा चहा प्यायल्याने तुम्ही दिवसभर ताजतवाने राहू शकतात. याच्या नियमित सेवनाने तुम्ही थकवा, अंगदुखी इत्यादी समस्यांपासून दूर राहू शकतात. त्याचबरोबर उष्णतेमुळे होणारी जळजळ शांत करण्यासाठी पुदिनाच्या चहाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

ऍसिडिटीपासून आराम मिळतो (Provides relief from acidity-Mint Tea)

बहुतांश लोकांना पोटात गॅस आणि ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी पुदिनाच्या चहाचे सेवन करू शकतात. पुदिन्याच्या चहामध्ये आढळणारे घटक पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर दररोज याचे सेवन केल्याने ऍसिडिटीपासून आराम मिळतो.

डोकेदुखीपासून आराम (Relief from headache-Mint Tea)

उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी पुदिन्याच्या चहाचे सेवन करू शकतात. पुदिन्याच्या चहाचे सेवन केल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि मुड फ्रेश राहतो. त्याचबरोबर हा चहा प्यायल्याने तणाव कमी होतो.

उन्हाळ्यामध्ये पुदिनाच्या चहाचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये त्वचा डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

भोपळ्याचा रस (Pumpkin juice-Skin Detoxification)

उन्हाळ्यामध्ये त्वचा डिटॉक्स करण्यासाठी भोपळ्याचा रस उपयुक्त ठरू शकतो. भोपळ्याच्या रसाचे सेवन केल्याने पोट थंड राहते आणि शरीर अनेक आजारांपासून दूर होते. या रसामध्ये फायबर, कॅल्शियम, विटामिन सी, झिंक भरपूर प्रमाणात आढळून येते. भोपळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्याने त्वचा चमकदार होते.

लेमन टी (Lemon Tea-Skin Detoxification)

उन्हाळ्यामध्ये लेमन टीचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. पोट थंड ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया मजबूत बनवण्यासाठी लेमन टी मदत करते. यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई, अँटी व्हायरल, अँटीऑक्सिडेंट, विटामिन सी गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला डिटॉक्स करण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये नियमित याचे सेवन केल्याने त्वचा चमकदार होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या