Eknath Shinde। “बदला घेण्याची, सूड घेण्याची..” ; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल!

Eknath Shinde। मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजप सोबत सत्ता स्थापन केली. यामुळे महाराष्ट्राची राजकीय समीकरणे बदलली. यर सध्या राजकिय वर्तुळात कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदेंवर टीका करत आमचं सरकार पाडलं असल्याचा आरोप केला होता. सरकार पाडल्याचा बदला घेतला जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यावर आता एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पलटवार ठाकरेंवर करत हल्लाबोल केला आहे.

बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात: एकनाथ शिंदे (Revenge, revenge, murderous attitude in you: Eknath Shinde )

ठाकरे यांच्या बदला घेणार या वक्तव्यावर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) म्हणाले की, बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही. तसचं आम्हाला कोणताही बदला घ्यायचा नाही. ती आमची वृत्तीच नाही. आम्ही कालही जनतेच्या हितासाठी काम करत होतो आजही करत आहोत. आम्हाला महाराष्ट्रात बदल घडवायचा आहे. इथल्या गरीब, कष्टकऱ्यांच्या जीवनात बदल घडवायचा आहे. तुम्ही फक्त स्वार्थाच्या कॅमेऱ्यातून बघत आहेत जर त्यांनी आणि दांभिकतेच्या लेन्समधून जगाकडे पाहिले तर खरे चित्र कधीच उमटत नाही. त्यासाठी निस्वार्थी जनसेवेचा कॅमेरा माणसाकडे असावा लागतो. हा कॅमेरा तुमच्याकडे तो कधीच नव्हता आणि येण्याची शक्यतही नाही.असा शब्दात शिंदेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले होते उध्दव ठाकरे (What did Uddhav Thackeray say)

सुरवातीला ‘जोडे पुसायची लायकी असणारे राज्य करत आहेत,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. तसचं
भारतीय कामगार सेनेच्या ५५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संवाद साधला. त्यावेळी देखील एअर कंडिशनरमध्ये बसू कॅबिनेट बैठका घेतात आणि कायदे बदलतात. पण यांना काहीच माहिती नाही. आपण मोर्चे काढले आहेत. पण आता आपल्याला हिंमत दाखवावी लागले, असं ठाकरे म्हणाले. बूट निर्माता कंपनी महाराष्ट्रात येणार आहे, असं मी या कार्यक्रमात येण्यापूर्वी एका ट्विटमध्ये वाचलं होतं. पण आता ही कंपनीही तामिळनाडूला गेली आहे. आता हे आरामात बूट पुसत बसतील. सरकार पाडण्याचा सूड मी नक्कीच घेईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरून पुन्हा एकदा शिंदे – ठाकरे डाव रंगला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.