Uddhav Thackery | कोकण रिफायनरी प्रकल्पाबाबत “जी स्थानिकांची भूमिका तिचं माझी भूमिका” : उद्धव ठाकरे

Uddhav Thackery | मुंबई : गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोकणातील रिफायनरी प्रकल्पनावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. या मध्ये अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देत विरोध केला आहे. तर सत्ताधारी सरकारने हा प्रकल्प कोकणातच होणार असल्याचं म्हटलं आहे. यावर आता शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackery) यांनी भाष्य करत आम्ही स्थनिकांच्या बाजूने उभे असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ( What did Uddhav Thackeray say)

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackery) म्हणाले की, माझी भूमिका स्पष्ट आहे. बारसु येथे होणार प्रकल्प हा आम्ही सत्तेत असताना केंद्र सरकारला पत्र देत परवानगी घेतली होती. ती परवानगी घेताना स्थानिकांची परवानगी असेल तरच त्या ठिकाणी प्रकल्प व्हावा या अटीवर घेतला होता. आम्ही कधीही पोलोसांच्या माध्यमातून लोकांवर जबरदस्ती केली नाही. मग तुम्ही गावकऱ्यांना मारझोड का करत? डोकी का फोडता? जर जमीन त्यांची आहे तर तुमची दादागिरी चालणार नाही अशा शब्दात ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे. या प्रकल्पाबाबत मी स्थनिकांच्या बाजूने असणार आहे . स्थानिक जी भूमिका घेतील ती माझी भूमिका आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बारसूबाबतचे पत्र मी दिले होते परंतु, पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प नको अशी आमची कायमच ठाम भूमिका आहे, परंतु त्यावेळी केंद्र सरकारकडून वारंवार विचारणा होत होती म्हणूनच बारसूचा अहवाल मागवून मी पत्र दिले होते. जिथे स्वागत होत असेल तिथे प्रकल्प लावा असंही ठाकरे म्हणाले. तर ठाकरे यांनी शिंदे गटावर देखील जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचे एवढे ऐकता तर मग गद्दारी करून सरकार का पाडले? आरे कारशेडचा निर्णय का फिरवला? कांजूरचा निर्णय का फिरवला? मी कोरोना सेंटर उभं केलं ते नाही बघितलं. पण सरकार पाडून ते बुलेट ट्रेनवाल्यांच्या घशात घातलं. रोज सकाळी उठून किती लोक बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाऊन परत येणार आहेत? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. तसचं हिंमत असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांसमोर जाऊन त्यांचे गैरसमज दूर करून पारदर्शकता आणावी, असा खोचक सल्लाही ठाकरे यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.