Weather Update | पुण्यात पावसाची हजेरी,तर ‘या’ भागांत अस्मानी संकट

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहे. कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे, तर कुठे उन्हाची तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली आहे. अशात बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी पुन्हा एकदा अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. … Read more

Published On: 

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: सध्या राज्यातील वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहे. कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे, तर कुठे उन्हाची तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली आहे. अशात बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणी पुन्हा एकदा अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पुण्यात पावसाची हजेरी (Presence of rain in Pune)

पुण्यामध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळी 9 च्या सुमारास डेक्कन, कोथरूड, हडपसर परिसरात पावसाने हजेरी लावली. पुण्यासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. दररोज पाऊस पडत असला तरी उष्णतेची तीव्रता कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

‘या’ भागांत अस्मानी संकट (Chance of rain in ‘these’ areas)

राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, बीड, परभणी, जालना, अमरावती, भंडारा, नागपूर, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर बुलढाणा, वाशिम, अकोला, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर या भागामध्ये पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शेतीतील पिकांना अवकाळी पावसाचा फटका (Unseasonal rains hit agricultural crops)

राज्यामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी (Weather Update) लावली. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांची नासाडी झाली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही