Share

Chandrashekhar Bawankule | “सत्यजीत तांबेंना ऑफर नाही, थोरातांना आमंत्रण”; भाजप प्रदेशाध्यांचं मोठं वक्तव्य

#Big_Breaking | मुंबई : काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी दरम्यान पक्षात केलेल्या बंडखोरीनंतर त्यांना भाजपने खुली ऑफर दिल्याच्या अनेक चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या. त्याबाबात आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकर परिषदेत त्यांनी सत्यजीत तांबेंबाबत आता मोठं वक्तव्य केलं आहे.

“सत्याजीत तांबे यांना भाजपने ऑफर दिली नाही”

सत्याजीत तांबे यांना भाजपने ऑफर दिली नाही, मात्र भाजपमध्ये आल्यास त्यांच्यासाठी दरवाजा खुले आहेत. भाजपमध्ये सर्वांसाठीच दरवाजे खुले आहेत, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना ऑफर दिली आहे.

“कोणासाठीही भाजपचे दरवाजे उघडे”(Chandrashekhar Bawankule Talk about Balasaheb Thorat)

बाळासाहेब थोरातच नाही तर कोणालाही पक्षात यायचं असेल तर दरवाजे उघडे आहेत. भाजपमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांचा मानच करु आणि त्यांची जी उंची आहे त्यापेक्षा जास्तच राहील, याची आम्ही काळजी घेऊ, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अप्रत्यक्षपणे बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याचे पहायला मिळाले आहे.

“काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची गरज” (Chandrashekhar Bawankule comment on Nana Patole)

“मी नाना पटोलेंना कोणताही सल्ला देऊ शकत नाही. त्यांना सल्ला देण्याचा मला अधिकार नाही. मी माझ्या पक्षाचं सांगतो की, माझ्या पक्षात कोणी मोठं नेतृत्व मागत असेल तर माझं आत्मचिंतन करायची मला गरज आहे. शेवटी पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे घर चालवण्याची. पक्षाचा अध्यक्ष हा कुटुंबाचा अध्यक्ष असतो. त्यांच्याकडून कोणी नाराज असेल तरीही माझी जबाबजदारी आहे घरी जाऊन समजूत काढण्याची. त्याचा पक्ष त्यांनी कसा चालवायचा ही त्यांची जबाबदारी आहे”, असे चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) म्हणाले आहेत.

“आमच्या पक्षात आल्यास आम्ही संधी देऊ”

“काँग्रेसमध्ये बी आणि सी कार्यकर्ते प्रचंड अस्वस्त आहेत. त्यांना काँग्रेसमधील अनेक नेते हे आपल्या मुलांना, नातेवाईकांना पुढे करण्याच्या नादात आहेत. त्या नादात ते 30-40 वर्षे कम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विसरुन जातात. ज्यावेळी आमच्याकडे कोणी येईल, त्यावेली आम्ही त्या कार्यकर्त्यांना संधी देऊ, आमच्या पक्षात आल्यावर त्यांना संधी देणं ही आमची जबाबदारी आहे”, असे चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

#Big_Breaking | मुंबई : काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी दरम्यान पक्षात केलेल्या बंडखोरीनंतर त्यांना भाजपने …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now