Bharat Gogawle | सरकार काही पडत नाही आणि आम्ही अपात्र होत नाही; भरत गोगावलेंचा ठाकरेंना टोला

| मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निर्णयानंतर आता सर्वांचं लक्ष १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाकडे लागलं आहे. तर काल ( 16 मे ) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar) यांनी विधिमंडळात पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलं. या दरम्यान त्यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना देखील चांगलचं सुनावलं आहे. शिंदे गट विरोध ठाकरे गट अशी खेळी अजूनही रंगलेली पहायला मिळत आहे. तर आता आमदार भरत गोगावले ( Bharat Gogawle) यांनी देखील संजय राऊतांवर जहरी टीका केली आहे. तसचं ठाकरेंना टोला देखील लगावला आहे

काय म्हणाले भरत गोगावले (What did Bharat Gogawle say)

भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे की, संजय राऊतांना कोणीही गांभीर्याने घेऊ नका. कारण ते व्हायबल झाले आहेत. आमचं ‘सरकार काही पडत नाही आणि आम्ही अपात्र होत नाही म्हणून संजय राऊत कासावीस झाले आहेत’. त्यांनी पाण्यात ठेवलेले देव वरती येत नाहीत. पायपुसणी की हातपुसणी हे वेळ आल्यावर त्यांना नक्की कळेल. असा टोला आमदार भरत गोगावले यांनी संजय राऊतांसह ठाकरेंना लगावला आहे.

दरम्यान, गोगावले पुढे म्हणाले की, सत्तासंघर्षाचा जो निकाल लागला तो आमच्या बाजूने लागला यामुळे अनेक आमदार त्यानंतर आमच्या संपर्कात आले आहेत. तसचं संजय राऊत जे काही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलतात ते त्यांना बोलू द्या. कारण त्यांना वाटतय सरकार पडेल परंतु असं काही होणार नाही यामुळे यांची ही अवस्था झाली आहे. अशी जहरी टीका केली आहे. याचप्रमाणे कोणीही कितीही दबाव टाकला तरीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे दबाव न येता निर्णय घेतील कारण ते स्वतः वकील आहेत आणि ते योग्य निर्णय घेतील असं देखील भरत गोगावले यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.