Narayan Rane | “मनसेचे आमदार-खासदार बघून राज ठाकरेंनी…”; नारायण राणे यांचा राज ठाकरेंवर घणाघात

Narayan Rane | पुणे: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुण्यात बोलताना मनसे पक्ष आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या मुद्द्यावरून नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधला आहे. संजय राऊत यांना कामधंदा नाही. शिवसेनेचा पोपट मातोश्रीवर होता तोवर ठीक होता, अशा शब्दात राणेंनी राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे.

राज ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवत नारायण राणे म्हणाले, “राज ठाकरे यांचे आमदार खासदार किती आहेत? त्यांनी ते बघून बोलावं. त्याचबरोबर त्यांनी आमच्यावर बोलू नये. राज ठाकरेंना आमच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था खूप चांगली आहे. जे कोणी दंगल घडवून आणेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल.”

“मोदी सरकार दहा लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध देणार आहे. मोदी सरकारने आतापर्यंत रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तीन लाख नोकऱ्या दिल्या आहेत. ज्या माणसाने अडीच वर्षात एकही नोकरीची संधी उपलब्ध करून दिली नाही, त्याची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत करू नये, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेवर निशाणा साधला आहे.

“आपल्याला महाराष्ट्रामध्ये उद्योग कसे येता माहिती आहे का? राज्यामध्ये अनेक परदेशी उद्योग येतात. मग बारसूतील प्रकल्पाला विरोध का? कोळसा प्रकल्प मालक उद्धव ठाकरे यांना भेटले होते. बारसूला सुपारी घेऊन विरोध केला जात आहे,” असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या