Sanjay Shirsat | “संजय राऊत शरद पवारांचे पायपुसणी…” ; संजय शिरसाटांचं संजय राऊतांवर टीकास्त्र

Sanjay Shirsat | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर शिवसेना ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून आले आहे. ठाकरे गटाने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Ziraval) यांना निकालाबाबत निवेदन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय शिरसाट बोलताना म्हणाले, “मी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार आहे. नार्वेकर सध्या ज्या पदावर बसले आहे, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्या पदाचा आणि खुर्चीचा अपमान केला आहे. म्हणून राऊतांवर हक्कभंगाची कारवाई केली पाहिजे. याबद्दल आम्ही कायदे तज्ञांशी बोललो आहे. अशा प्रतिक्रिया देणाऱ्या मूर्ख माणसांवर कारवाई केली पाहिजे.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “संजय राऊत सकाळपासून संध्याकाळपर्यंत शरद पवार शरद पवार करत असतात. त्यांचं नेहमी पवारांच्या घरी येणं जाणं असतं. खऱ्या अर्थाने संजय राऊत शरद पवारांची पायपुसणी झाले आहे.”

संजय राऊत म्हणतात शिंदे गटाचा पोपट मेला आहे, तर देवेंद्र फडणवीस म्हणतात महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे. त्यावर प्रतिक्रिया देत शिरसाट म्हणाले, “नक्की कुणाचा पोपट मेला आहे हे लवकरच कळेल. मात्र, महाविकास आघाडीचा पोपट आधीच मेला आहे. महाविकास आघाडी जास्त दिवस टिकणार नाही. हे त्यांच्या बैठकीवरून दिसून येत आहे. त्यांचा कधी मेल मिलाप होऊ शकत नाही. कारण संजय राऊत ज्याच्यासोबत असतात त्यांचं  हेच होतं, असा सणसणीत टोला शिरसाटांनी आणि राऊतांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.