Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकच शहाणा माणूस बाकी सर्व मूर्ख…”; संजय राऊतांचा टोला नेमका कुणाला?

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नेहमी आक्रमक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. संजय राऊत नेहमी भाजप आणि शिंदे गटावर टीका करत असतात. अशात राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. हे सरकार बेकायदेशीर आहे आणि बेकायदेशीर सरकारचे आदेश पाळू नका, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. त्याचबरोबर या सरकारमध्ये एक व्यक्ती सोडून बाकी सगळे अतिशहाणे आणि मूर्ख आहे, असा टोला देखील त्यांनी राज्य सरकारवर लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देत संजय राऊत म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने मेलेल्या पोपटाविषयी भाष्य केलं आहे. पोपट मेलाच आहे तो फक्त विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचं बाकी आहे. मला वाटत होतं की या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. बाकी या सरकारमध्ये सगळे मूर्ख आणि अतिशहाणे आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस असं बोलायला लागले तर शहाणपणाची व्याख्या बदलावी लागेल.”

“आमच्या दृष्टीने सध्याचे सरकार बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर सरकारचे आदेश पाळणे अयोग्य आहे. सध्या दिल्लीच्या दरबारामध्ये महाराष्ट्राचा पायपुसणं झालं आहे आणि त्याला जबाबदार शिंदे-फडणवीस सरकार आहे”, असं देखील ते यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले? (What exactly did Devendra Fadnavis say?)

“एक अभ्यासक, एक वकील आणि पंचवीस वर्षे विधानसभेत कार्य केलेली व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की, महाविकास आघाडीला आता समजलं आहे की पोपट मेला आहे. तरीदेखील तो हातपाय आणि मान हलवत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी ते बोलतात. कारण त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना आशा दाखवावी लागत आहे”, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.