Weather Update | मोचा चक्रीवादळामुळे राज्यात येणार उष्णतेची लाट, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात बदल होताना दिसत आहे. अवकाळी पावसानंतर (Unseasonal rain) पुन्हा एकदा राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमानाचा पारा चाळिशीच्या पार जाऊन पोहोचला आहे. अशात उद्यापासून म्हणजेच 17 मे पासून उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

सध्या सक्रिय असलेल्या मोचा चक्रीवादळाचा (Cyclone Mocha) परिणाम देशासह राज्यामध्ये दिसून येणार आहे. राज्यामध्ये 17 मे पासून पुन्हा एकदा उष्णता वाढणार (Weather Update) असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन खात्याकडून करण्यात आले आहे.

राज्यामध्ये वाढत्या उष्णतेमुळे लोक बेजार आहे. वाढत्या तापमानामुळे उकड्याचा सामना करावा लागत आहे. राज्यात कमाल तापमान तब्बल 44 अंश सेल्सिअस नोंदवण्यात (Weather Update) आले आहे. अशात राज्यातील बहुतांश शहरांमध्ये उष्णताची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान, मोचा चक्रीवादळामुळे दिल्ली आणि आसपासच्या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज (Weather Update) हवामान खात्याने दिला आहे. राजस्थानमधील बिकानेर, जैसलमेर, भरतपूर या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

महत्वाच्या बातम्या