Ambadas Danve | राज्यातील दंगलींना राज्य शासन जबाबदार?; अंबादास दानवे यांचं राज्य सरकारवर टीकास्त्र

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: अकोला आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये झालेल्या दंगलींवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र दंगली प्रकरणासाठी अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला दोषी ठरवलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक या घटना घडवल्या जात असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

अंबादास दानवे म्हणाले, “राज्यामध्ये होणाऱ्या दंगलींमागे राज्य शासनाचा हात तर नाही ना? कारण भाजपचे लोक म्हणतात की, छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि शेवगाव झालेल्या दंगलींमध्ये कुठे काहीच झालेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात जाणीवपूर्वक या घटना घडवण्याचे काम सरकार करत आहे. या घटनानंतर राज्याच्या गृह विभागाला अजूनही शहाणपण सुचलेलं नाही.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “छत्रपती संभाजीनगरमध्ये जे घडलं तेच अकोल्यामध्ये घडलं आहे. अकोल्यामध्ये देखील संभाजीनगर प्रमाणे पोलीस घटनास्थळी दीड-दोन तास उशिरा पोहोचले. या सर्व गोष्टींचा तपास करायला पाहिजे. जाणीवपूर्वक सत्ताधारी पक्ष हे सर्व घडवत आहे.”

समाज आणि जातीमध्ये मुद्दाम फूट पाडण्याचे काम सुरू आहे. कारण सत्ताधारी सरकार जनतेला आणि विरोधकांना जनतेच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे मूळ प्रश्नापासून दूर जाण्यासाठी सरकार हिंसाचार घडवून आणत आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.