Devendra Fadnavis | “या दंगली जाणीवपूर्वक…” ; महाराष्ट्र दंगली प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | मुंबई: महाराष्ट्रातील अकोल्यानंतर शेवगावमध्ये जोरदार दंगल झाली. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये काल दोन गटांमध्ये दगडफेक झाली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये जोरदार राडा झाल्याचे दिसून आलं आहे. या दगडफेकीमध्ये चार पोलीस जखमी झाले आहे. या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “दंगलींवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होत आहे. या दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जात आहे. सध्या दोन्ही ठिकाणी पूर्णपणे शांतता आहे. त्याचबरोबर पोलीस अलर्ट मोडवर आहे, त्यामुळे कुठेही अनटोल्ड इन्सिडेंट होणार नाही.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “जेव्हा लक्षात आलं की अशा प्रकारच्या दंगली घडवण्याचा लोक प्रयत्न करत आहे, तेव्हा लगेच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. आता पूर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या दंगली होऊ देणार नाही. राज्यामध्ये जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना अद्दल घडवणार.”

“काही लोक आणि काही संस्था या प्रकरणाला आग लावण्याचा प्रयत्न करत तेल ओतत आहे. आम्ही हे सगळं प्रकरण बाहेर आणणार आहोत”, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या