Nitesh Rane | महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची अवस्था सरदारासारखी; नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात विविध गोष्टी घडत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर टीका करत आहेत. भाजपसोबत असताना उद्धव ठाकरे यांचा सन्मान होता. मात्र, महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची अवस्था सरदारासारखी झाली आहे, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

पत्रकारांशी संवाद साधत असताना नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांचा रुबाब होता. मात्र, उद्धव ठाकरे यांची अवस्था खूप वाईट आहे. युती सरकारमध्ये ठाकरे यांना सन्मान मिळायचा. पण महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची अवस्था दरबारातील सरदाराप्रमाणे झाली आहे. महाराष्ट्रामध्ये दंगली घडवून आणण्याचा प्लॅन उद्धव ठाकरे यांचा होता, याबाबत पोलिसांनी तपास करायला हवा.”

या पत्रकार परिषदेमध्ये नितेश राणेंनी संजय राऊतांवर घणाघात केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “संजय राऊत नाना पाटोळे यांच्या बाजूला बसून काँग्रेसचा अपमान करतात. त्याचबरोबर संजय राजाराम राऊत महाविकास आघाडीतील शकुनी मामा आहे.” कर्नाटकमध्ये हिरवे झेंडे लावून काँग्रेस कुणाला खुश करत आहे? काँग्रेसला की पाकिस्तानला असा सवाल देखील नितेश राणे यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “माझ्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे एक प्रकारचे दबाव तंत्र आहे. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाल्यामुळे देशातील निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव भारतीय जनता पक्ष आखात आहे. कर्नाटकमध्ये कमळाच्या पाकळ्या गळाल्या आहे. हिम्मत असेल तर मुंबईसह 14 महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा. जिथं ‘ऑपरेशन लोटस’ होतं तिथं भाजपाच्या पाकळ्या गळून पडतात. कर्नाटकच्या जनतेने भाजपला चांगलाच धडा शिकवला आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.