Weather Update | तापमानाचा पारा 40 पार, तर आणखी पाच दिवस होणार उन्हाचा त्रास

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत होता. त्यानंतर बंगाल उपसागरामध्ये सक्रिय असलेल्या मोचा चक्रीवादळामुळे हवामान बदलले. अशात पुन्हा एकदा वातावरणात बदल झालेला असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विदर्भामध्ये 9 शहरांमध्ये तापमानाचा पारा चाळीशीच्या पार नोंदवण्यात आला आहे.

राज्यामध्ये तापमान (Weather Update) झपाट्याने वाढवताना दिसत आहे. विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवण्यात आला आहे. तर अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. अकोला शहरामध्ये तापमान 45.5 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचले आहे. त्याचबरोबर राज्यातील 17 शहरांचा पारा चाळिशीच्या पार होता.

नाशिकमध्ये तापमानात (Weather Update) घसरण झाल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी 36.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून काही भागात उष्णता तीव्रता वाढली आहे. तर पुढील पाच दिवस कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, मोचा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून आज दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली (Weather Update) आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.