Karnataka Election Results | कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सुटला ? डी के शिवकुमार म्हणाले; “मी पक्षासाठी अनेकदा…”

DK Shivkumar | बंगळुरू : काल (13 मे) संपूर्ण देशाचं लक्ष ज्या निवडणीच्या निकालाकडे लागलं होतं ती म्हणजे कर्नाटक विधानसभा निवडणुक. काँग्रेसने (Congress) मोठा विजय मिळवत भाजपचा पराभव केला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. कर्नाटकमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (D. K. Shivakumar) ही दोन्ही नावं मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहेत. यामुळे आता काँग्रेस नक्की कोणाकडे मुख्यमंत्री पद देणार? का काँग्रेस 50-50 फॉर्म्युला वापरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधत काही संकेत दिले आहेत.

काय म्हणाले डी. के. शिवकुमार (What did say D. K. Shivakumar)

माध्यमांशी बोलताना डी. के. शिवकुमार म्हणाले की,काही लोक म्हणतात की, माझे सिद्धरामय्या यांच्याशी मतभेद आहेत. पण मला हे स्पष्टपणे सांगायचं आहे की, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. “मी पक्षासाठी अनेक त्याग केले आहेत आणि सिद्धरामय्या यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे”. मी सिद्धरामय्या यांना पाठिंबा दिला आहे. अशी प्रतिक्रिया शिवकुमार यांनी दिली आहे. यामुळे त्याच्या या प्रतिक्रियेवरून तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याच होणार याचे संकेतही मिळत आहेत.

दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याच होणार याचे संकेतही शिवकुमार यांनी अप्रत्यक्षपणे दिले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल झाला यामध्ये 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 113 हा बहुमताचा आकडा आहे. तर काँग्रेसने 135 जागांवर विजय मिळवला,भाजपला 65 जागांवर समाधान मानावं लागलं यामुळे कर्नाटकच्या निवडणुकीचे परिणाम महाराष्ट्र दिसणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.