Nitesh Rane | संजय राऊत 90 दिवसात पुन्हा जेलमध्ये जाणार ; नितेश राणेंचा दावा

Nitesh Rane | मुंबई : राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत पावलं उचलली जातं असल्याचं पाहायला मिळतं आहे. आठवड्याभरात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला १६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर ठाकरे गटाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) … Read more

Published On: 

Nitesh Rane | मुंबई : राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत पावलं उचलली जातं असल्याचं पाहायला मिळतं आहे. आठवड्याभरात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला १६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर ठाकरे गटाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निर्णय घेण्याबाबत राहुल नार्वेकरांना चांगलंच सुनावलं आहे. राऊत म्हणाले आहेत की, परदेशात बसून आम्हाला वेळचं प्रवचन देऊ नका. त्याच्या या भाष्यवर भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांबाबत मोठा दावा केला आहे. संजय राऊत आणि नितेश राणे एकमेकांनावर टीका- टिप्पनी करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हे दोघे या दाव्यावरून भिडले आहेत.

तुला काय करायचंय ते कर : नितेश राणे

नितेश राणे म्हणाले की, जर संजय राऊतांनी भाजपाच्या नेत्यांना धमक्या दिल्या तर आम्हीही गप्प बसणार नाही. राऊत तुम्ही धमकी देण्याचे दिवस गेले आहेत. यामुळे जे काही योग्य असेल तेच राहुल नार्वेकर करणार आहेत. यामुळे नको ते त्यांना शिकवू नका. कायद्याच्या चौकटीत राहूनच ते निर्णय घेतील यामुळे ” जर ते चुकीच वाटत असेल तर तुला काय करायचंय ते कर”, अशा शब्दांत संजय राऊतांवर नितेश राणे यांनी पलटवार केला आहे. याचप्रमाणे राणे यांनी दावा केला आहे की, 90 दिवसात संजय राऊत जेलमध्ये जातील.

(Nitesh Rane Commented On Sanjay Raut )

दरम्यान, नितेश राणे पुढे म्हणाले की, मी पैज लावून सांगतो की, पुढच्या तीन महिन्यात म्हणजेच 90 दिवसात
पत्राचाळ प्रकारनामुळे राऊत जेलमध्ये जाणार आहेत. काही दिवसांचेच ते आता मेहमान राहिले आहेत. यामुळे त्यांनी जपून राहावं. असा दावा नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. तसचं 2019 मध्ये शरद पवार यांनी ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं परंतू संजय राऊतांना सरकार पाडायचं होतं आणि स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या खुर्चीच्या खाली टाईमबॉम्ब लावण्याचं काम केलं आहे. असा पलटवार देखील नितेश राणेंनी संजय राऊतांवर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही