Sanjay Raut | पक्षांतर करणं हा राहुल नार्वेकरांचा छंद – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : सत्तासंघर्षाचा निकाल लागला परंतु अजूनही 16 अपात्र आमदारांचा निकाल बाकी आहे. यावरून ठाकरे गटाकडून याबाबत हालचाली सुरू आहेत. तर खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Sanjay Raut) यांना चांगलंच फटकारलं आहे. तसचं त्यांनी राज्यपालांच्या कृतीवर देखील भाष्य केलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत (What did Sanjay Raut say)

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, कोर्टानं सांगितलं आहे लवकरात – लवकर निर्णय घ्यावा त्याप्रमाणे लोकशाहीच्या चौकटीत राहून निर्णय घ्या. परदेशात बसून प्रवचने देऊ नका. जशी राज्यपालांनी अब्रू घालवली तुम्ही तशी तुम्ही अब्रू घालवून घेवू नका, अस राऊत यांनी म्हटलं आहे. याचप्रमाणे राहुल नार्वेकर परदेशात बसून सांगतात की,16 आमदार कसे अपात्र होतील. परंतु ” पक्षांतर करणं हा राहुल नार्वेकरांचा छंद आहे” असं म्हणतं राऊतांनी नार्वेकरांना खोचक टोला लगावला आहे. पक्षांतराला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही. आम्ही कोर्टाच्या आदेशाचं फक्त पालन करतो. नाही तर महाराष्ट्र काय आहे हे दाखवावे लागेल.  म्हणून तुम्हाला कायद्याचं पालन करा हे सांगतोय. पक्षांतराला उत्तेजन देऊन लोकशाहीची हत्या करणं हे चालू देणार नाही. असं देखील संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होत की, . निर्णय घेण्यासाठी आमच्याकडे अमर्याद वेळ आहे. त्यांच्या या वक्तव्यावर देखील राऊतांनी पटलावर करत म्हटलं की, प्रत्येक गोष्टीला वेळेचं बंधन असत यामुळे तुम्ही कोण असे लॉर्ड फॉकलंड लागून गेला आहात? इथे ब्रिटिशांचा कायदा चालत नाही. हे भारतीय संविधान आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी नार्वेकर यांच्यावर पलटवार केला आहे. याचप्रमाणे माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर देखील सडकून टीका केली. जो लफंगा राज्यपाल बसवला होता त्यांनी निवडणूक होऊ दिली नाही. कारण त्यांना दिल्लीचे आदेश होते. दिल्लीतून मोठं राजकारण करायचं होतं. यामुळे तुम्ही त्यांच्यासारखं करू नका नाहीतर जनता रस्त्यावर फिरणं बंद करेल. अशा शब्दात राहुल नार्वेकर निशाणा लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-