Sanjay Raut | संजय राऊतांवर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

Sanjay Raut | नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) आपल्या अनेक वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत असतात. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर संजय राऊत (Sanjay Raut) अधिकच आक्रमक भूमिका घेत टीका -टिपण्णी करताना पाहायला मिळत आहेत. तर आता यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण संजय राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक आवाहन केलं होतं यामुळे यांच्यावर नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत (What did Sanjay Raut say)

संजय राऊत यांनी असं आवाहन केलं होतं की, राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीस आणि कोणत्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाचे पालन करू नये. तसचं जनतेने देखील या सरकारच्या नियमांचे पालन करु नये, असं आवाहन संजय राऊत त्यांनी केलं होतं. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, चार दिवसांआधीच सत्ता संघर्षावर सुप्रिम कोर्टाने निर्णय जाहीर केला आहे. त्यावर देखील राऊत यांनी भाष्य करत म्हटलं होते की, हे सरकार अजूनही अपात्र 16 आमदारांच्या भरवश्यावर आहे यामुळे ते बेकायदेशीर असल्याने कोणिही त्याच्या नियमांचं पालन करू नये. यामुळे राऊतांवर कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप नेते नितेश राणे यांनी देखील संजय राऊत 90 दिवसात पत्राचाळ प्रकारात पुन्हा जेलमध्ये जाणार असल्याचा दावा केला आहे. यामुळे आता संजय राऊतांना सर्वबाजूने घेरलं जातय की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-