IPL 2023 | प्लेऑफ पूर्वी CSK ला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू सीजनमधून बाहेर

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल 2023 चा शेवटचा टप्पा आला आहे. 20 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यामध्ये शेवटचा साखळी सामना होणार आहे. प्लेऑफच्या दृष्टिकोनातून हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. अशात सीएसकेला मोठा झटका बसला आहे. संघातील एक महत्त्वाचा खेळाडू सीजनमधून बाहेर पडला आहे.

चेन्नई सुपर किंग्स स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) पूर्णपणे तंदुरुस्त झाला नसल्यामुळे तो प्लेऑफच्या आधी मायदेशी परतणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. या आयपीएल हंगामामध्ये बेन स्टोक्स पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. दुखापतीमुळे त्याला या हंगामामध्ये फारसे सामने खेळता आले नाही.

आयपीएल 2023 मध्ये बेन स्टोक्सने फक्त दोन सामने खेळले आहे. हा अष्टपैलू खेळाडू बॅट आणि बॉल दोन्ही बाबतीत फ्लॉप ठरला आहे. सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी त्याच्या दुखापती बाबत प्रतिक्रिया दिली आहे. तो अजून फलंदाजी आणि गोलंदाजी करण्यास तयार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या चेन्नई सुपर किंग संघ गुणतालिकेमध्ये 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. सीएसकेला शनिवारी म्हणजेच 20 मे रोजी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकल्यानंतर सीएसके प्लेऑफमध्ये पोहोचेल.

महत्वाच्या बातम्या