Rahul Narvekar On Sanjay Raut | राऊतांच्या टीकेवर नार्वेकर म्हणाले, “राऊतांना मी कडीमात्र किंमत देत नाही”

Rahul Narvekar On Sanjay Raut | मुंबई: राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मागच्या आठवड्यात दिला. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलत असताना नार्वेकरांनी संजय राऊत यांच्या टिकेला उत्तर दिलं आहे.

माध्यमांशी बोलताना नार्वेकर म्हणाले, “मला धमक्या देऊन हवा तो निर्णय मिळणार नाही. संजय राऊत यांच्या टीकेला मी काडीमात्र किंमत देत नाही. त्याचबरोबर संजय राऊतांकडं दुर्लक्ष केलेलं बरं असतं. मात्र, त्यांनी वेळीच आपलं बोलणं थांबवावं”

“सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर हा निर्णय द्यायला सांगितलं आहे. या निकालापूर्वी काय काय प्रक्रिया करावी लागणार आहे, हे आधी बघावं लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाला हा निर्णय घेण्यासाठी साधारण दहा महिने लागले होते. मी दोन महिन्यात हा निर्णय कसा देणार?”, असा सवाल देखील राहुल नार्वेकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे

“विधानसभेमध्ये राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व कोण करेल? हे देखील मला आधी बघावे लागणार आहे. त्याचबरोबर मुख्य व्हीपच्या नियुक्तीबाबत निर्णय दिला जाईल. हा निर्णय दोन्ही पक्षाचे मत ऐकून घ्यावा लागणार आहे. त्यानंतरच एका गटाला पक्षाचा अधिकृत अधिकार मिळेल”, असं देखील ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Back to top button