IPL 2023 | प्लेऑफमधून CSK आणि MI चा पत्ता कापू शकतात ‘हे’ दोन संघ

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा शेवटचा आठवडा आला आहे. आयपीएल 2023 मध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स (Gujarat Titans) प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. हा संघ प्लेऑफमध्ये जाणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरातनंतर प्लेऑफमध्ये इतर कोणते तीन संघ जातील? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

आयपीएल 2023 प्लेऑफमधून चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चा पत्ता कट होऊ शकतो. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) ने शेवटचे दोन सामने जिंकले तर हे दोन्ही संघ CSK आणि MI च्या जागी प्लेऑफमध्ये जाऊ शकतात. RCB आणि पंजाब किंग्सने शेवटचे सामने जिंकले तर दोन्ही संघ 16 पॉइंट्सने प्लेऑफमध्ये जातील. त्यामुळे MI आणि CSK ला प्लेऑफ गाठण्यासाठी शेवटचे सामने जिंकावे लागणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा शेवटचा सामना 20 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर होणार आहे. तर मुंबईचे शेवटचे दोन सामने लखनऊ आणि हैदराबादविरुद्ध होणार आहेत. CSK आणि MI ने हे सामने जिंकले तरच ते प्लेऑफमध्ये क्वालिफाय करू शकतात.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) पूर्णपणे तंदुरुस्त झाला नसल्यामुळे तो प्लेऑफच्या आधी मायदेशी परतणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे. या आयपीएल हंगामामध्ये बेन स्टोक्स पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. दुखापतीमुळे त्याला या हंगामामध्ये फारसे सामने खेळता आले नाही.

महत्वाच्या बातम्या

Back to top button