Manikrao Kokate । 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार दंड ठोठावला आहे. याप्रकरणी त्यांना जामीन देखील मंजूर झाला आहे.
पण अजूनही त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद गेले नाही. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
अशातच आता यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी एक वक्तव्य केले आहे. “निवडणूक आयोगाने (Election Commission) पाठवलेल्या नियमांचे पालन करून योग्य निर्णय घेऊ. नियमाच्या अनुषंगाने, कोर्टाची अधिकृत प्रत आली तर केवळ सात दिवसात नोटिफिकेशन काढण्याची अट आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, आम्ही कोणत्याही प्रकारचा पक्षपात करणार नाही. कायद्यातील तरतूद आणि निवडणूक आयोगाचे नियम पाहूनच कारवाई केली जाईल,” असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
Rahul Narvekar on Manikrao Kokate
तसेच राहुल नार्वेकर यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर टीका केली आहे. “संजय राऊत यांना कायद्याची जाणीव आणि माहिती नाही. त्यांनी नोटिफिकेशन्सच्या तरतुदी वाचाव्यात. सुषमा अंधारे अंधारात आहेत. त्यांना त्याबाबतची काही माहिती नाही. आमच्याकडे अजून नोटिंग आलं नाही. सुनील केदारांच्या बाबतीत नियम आणि तरतुदीचं पालन करून सर्टिफाईड कॉपी आल्यावर निर्णय घेतला. आताही तोच नियम लावला जाईल, ” असे देखील राहुल नार्वेकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :