Manikrao Kokate । अजित पवार गटाचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून त्यांची आमदारकी धोक्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
कोकाटे यांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने (District Court of Nashik) दोन वर्षांची शिक्षा सुनावली असली तरी काही तासांमध्ये त्यांना जामीन देखील मंजूर झाला. दरम्यान, कोकाटे यांना न्यायालयाने दणका दिला असला तरी त्यांच्यावर अजून कारवाई का केली नाही? असा सवाल उपस्थित झाला आहे.
विरोधक देखील माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून (Manikrao Kokate resignation demand) चांगलेच आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेबाबत अजूनही विधिमंडळाकडे प्रत मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, एखाद्या विधिमंडळ सदस्याला शिक्षा सुनावली तर पोलीस किंवा न्यायालयाकडून विधिमंडळाला पत्र दिले जाते. पण अशी प्रत विधिमंडळाकडे मिळाली नसल्याने त्यांच्यावर कारवाई केली नाही, अशी माहिती समोर आली आहे.
Demand of Manikrao Kokate resignation
जरी जामीन मंजूर झाला असला तरी जर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी टिकून राहिली तर याचा परिणाम सरकारला भोगावा लागणार आहे. कारण विरोधक सरकारला राजीनाम्याच्या मागणीवरून घेऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :