Share

Champions Trophy 2025 । पाकिस्तानने जिंकला टॉस, पहिल्यांदा बॅटिंग की बॉलिंग? जाणून घ्या..

by MHD
Pakistan won toss and decide batting first in Champions Trophy 2025

Champions Trophy 2025 । बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असणाऱ्या भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. संपूर्ण देशासह चाहत्यांचे या हायव्होल्टेज सामन्याकडे लक्ष लागले आहे. (India vs Pakistan)

पाकिस्तानने टॉस जिंकला (Pakistan won toss) आहे. कर्णधार मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. मागील 10 सामन्यांमध्ये दुबईमध्ये टॉस जिंकून 7 वेळा पहिले गोलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. दरम्यान, दुबईत आतापर्यंत एकूण 58 एकदिवसीय सामने खेळवले आहेत.

यापैकी एकूण 35 सामन्यांत पहिले फिल्डिंग करणारी टीम जिंकली आहे. आकडेवारीनुसार दुबईत टॉस फॅक्टर निर्णायक ठरला आहे, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असे असले तरी हा सामना कोण जिंकणार? हे लवकरच स्पष्ट होईल.

Team India for ICC Champions Trophy 2025

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.

Team Pakistan for ICC Champions Trophy 2025

मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), बाबर आझम, कामरान गुलाम, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद, हारिस रौफ, मोहम्मद हसनैन, उस्मान खान, इमाम उल हक आणि सौद शकील.

महत्त्वाच्या बातम्या :

Pakistan vs India match in Champions Trophy 2025 today. Everyone is paying attention to this match.

Sports Cricket Marathi News

Join WhatsApp

Join Now