Bhagat Singh Koshyari | “त्यांनी मला विमानातून उतरवलं आणि नियतीने त्यांना खुर्चीवरुन”; कोश्यारींनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

Bhagat Singh Koshyari | मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच आता महाराष्ट्राची माजी राज्यपाल यांनी राज्यातील विविध विषयांबद्दल भाष्य करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तर त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत एक वक्तव्य केले आहे. कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे सरकारच्या काळात राज्यपाल असणाऱ्या भगतसिंह कोश्यारींना विमानातून उतरवण्यात आलं होतं. या घटनेवरुन भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

Bhagat Singh Koshyari criticize Uddhav Thackeray

“उद्धव ठाकरे हे संत माणूस आहेत. ते कुठे राजकारणात आले? त्यांनी त्यांची संघटना व्यवस्थितपणे चालवायला हवी होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसण्याच्या लायकीची व्यक्ती नव्हती तरीही त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. शरद पवारांसारखा मार्गदर्शकही उद्धव ठाकरेंना वाचवू शकला नाही. मी महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी मला विमानातून उतरवलं होतं. आता नियतीने त्यांना खुर्चीवरून काली उतरवलं आहे” अशी खोचक टीका भगतसिंह कोश्यारींनी केली आहे.

“नियतीने तुम्हाला मुख्यमंत्रीपदावरून, त्या खुर्चीवरूनच खाली खेचलं” – Bhagat Singh Koshyari

“उद्धव ठाकरेंना बळीचा बकरा करण्यात आलं. मी देवापुढे प्रार्थना करतो आहे की त्यांनी या सगळ्यापासून लांब रहावं. उद्धव ठाकरेंना बळेबळेच मुख्यमंत्री केलं गेलं. उद्धव ठाकरेंनी मला विमानातून उतरवलं. मात्र नियतीने तुम्हाला मुख्यमंत्रिपदावरून, त्या खुर्चीवरूनच खाली खेचलं. मी त्यांना सत्तेतून खाली खेचलं नाही, पण नियतीने जे करायचं ते केलं”, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.