Shivsena | ठाकरे-शिंदे कार्यकर्ते भिडणार?; पालिका कार्यालयासमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा

Shivsena | मुंबई : निवडणूक आयोगाने शुक्रवारी उशिरा शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल हा शिंदे गटाच्या बाजूने दिला. त्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. त्यावर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यामुळे शिंदे गटामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. शिंदे गटाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. त्यामुळे आता शिंदे गटाने शिवसेनेच्या नावावरील सर्व वास्तू ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाने आज आपला पहिला मोर्चा विधीमंडळातील शिवसेनेच्या कार्यालयाकडे वळवला.

शिंदे गटाच्या आमदारांचा विधीमंडळातील कार्यालयावर ताबा

शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळातील कार्यालय ताब्यात घेतलं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. यावेळी फक्त आणि फक्त शिंदे गटाचे आमदार आणि पदाधिकारी उभे होते. ठाकरे गटाचा एकही पदाधिकारी आणि आमदार उपस्थित नव्हता. कोणताही खळखळ झाली नाही. विरोध झाला नाही आणि घोषणाही झाल्या नाहीत.

शिंदे गटाचा मोर्चा आता महापालिकेकडे

आता विधान भवनानंतर शिंदे गटाचा मोर्चा मुंबई महापालिकेकडे वळला आहे. मुंबई महापालिकेचा ताबा शिंदे गटाने घेतला तर शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांचा फौजफाटा आणि दंगल नियंत्रण दल महापालिकेमध्ये दाखल झाला आहे.

ठाकरे-शिंदे कार्यकर्ते आपापसात भिडणार?

दरम्यान, मुंबई महापालिका हि ठाकरे गटाच्या ताब्यात असतानाच शिंदे गटाने पालिकेवर दावा करत मोर्चा वळवला तर शिंदे आणि ठाकरे गटामध्ये राडा होण्याची दाट शक्यता असल्याने आता पोलिसांकडून आणि दंगल नियंत्रण दलाकडून याची खबरदारी घेतली गेली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.